गणिका वेश्या हा विषयंच मुळात थोडा अवघडवणारा. कदाचित या शब्दाच्या वेगळेपणातून, त्यामागच्या आकलनातून थोडी विचित्रभावना निर्माण होते खरी. त्यामुळेच त्यातल्या त्यात त्याच्यासाठीचा सुसंस्कृत असा शब्द 'गणिका' वापरल्यास त्या शब्दाची तीव्रता न जाणवता काहीतरी लिहिता येऊ शकेल. तर 'गणिका' या पूर्वापार काळापासून चालत आलेला समाजाचा अविभाज्य भाग. अगदी गुरूचरित्रातही त्यांचे दाखले मिळतात. 'मनाने पवित्र असलेल्या गणिकेला कुलिन व देवाधिकांची कर्मकाण्डं करणार्या पवित्र विवाहित स्रीच्या तुलनेत उच्च गती मिळाली होती' असा तो दाखला. पण तरिही गणिका हा विषयच मुळात अनेक प्रश्न घेऊन येतो व त्याची उत्तरंही कदाचित कोणालाच माहीत नसतात. तेव्हा पहिला प्रश्न हा पडतो की गणिकांची खरंच समाजाला गरज आहे का? तर आगतिकपणे जगणार्या स्रीयांकडे पाहिल्यावर याचे उत्तर नाही असेच येते. समाजातल्या काही घटकांच्या अनियंत्रित लिंगपिसाट वृत्तीचे, उर्जेचे साधन म्हणजे या गणिका. स्वतःचं स्वत्व लोपवून सर्व संसारसुखांचा अपरिमित त्याग करून समाजाच्या अनिर्बंध व...
पोस्ट्स
जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे