वात्सल्य कथा
अनुबंध माणसानं दुध दुभत्यासाठी गाया म्हशी पाळल्या. शेतीसाठी बैलं पाळली. कोंबड्या, शेळ्या पाळल्या. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्याला चांगला आधार मिळाला. शेतीमध्ये असणारी अनिश्चितता या व्यावसायिकतेने काही प्रमाणात कमी झाली. दुधासाठी पाळलेल्या गाया, म्हशी व माणूस यांच्यात सहवासाने काळानुरूप भावनिक बंधही निर्माण झाले. प्रेमाच्या माणसालाच कासेला हात लावू द्यायचा. प्रेमाच्या माणसानं दुध काढलं तरंच दूध भरपूर द्यायचं. असं हे माणूस व मुक्या प्राण्यांमधलं प्रेमाचं नातं खेड्यात गेल्यावर बर्याच ठिकाणी पहायला मिळतं. या जवळकीचं वात्सल्याचं प्रतिक अभिव्यक्त करणारी गोष्ट माझ्या मोशीच्या आजीच्या बाबतीत घडली होती. मला तीनं ती प्रेमानं व अभिमानानं सांगितली. इतरांपेक्षा खूप वेगळी म्हणूनंच मला ती खूप विशेष वाटते. मृत्यू व जीवनाच्या दारातली ही गोष्ट. कड्याच्या टोकाला सर्व पायंच हवेत व फक्त अंगठा कड्याच्या टोकावर असेल तर जीवाची काय अवस्था होईल त्या सीम...