किचन
किचन लाॅकडाऊनमध्ये सगळंच बंद. प्लंबरपासून न्हाव्यापर्यंत आणि भाजीवाल्यापासून हाॅटेलींगपर्यंत. हाॅटेलींग..... का तर काळाची गरज.. अन् दुसरं काय? आजकालच्या माॅडर्न गृहिणी कामामुळं म्हणा, कंटाळा म्हणा किंवा जंक फुडचा जिभेला लागलेला चटका म्हणा आठवड्यातले फक्त सातच दिवसं बाहेरचं जेवण मागवतात. पूर्वी तर बिचार्या नवरोबाला किंवा प्रत्यक्ष बायकोबाला सुद्धा पार्सलसाठी हाॅटेलांबाहेर गर्दी करावी लागायची. हे झोमॅटो आणि तत्समांनी बरोब्बर ओळखलं आणि पूढं घरच्या घरी या बायाबाप्यांची सोय करुन टाकली. नीट पाह्यलं तर लक्षात येईल की या बायाबाप्यांनी हाॅटेलींगमधल्या कितीतरी संस्थांचा केवढा मोठा अर्थभार उचललाय. त्यामुळे भलेही किचन संकुचित झालं असेल पण चार माणसांची पोटं भरायला लागली हे बाकी खरं. आणखी पुढे जाऊन मला तर वाटतंय कि एखादी बापडी आपल्या बाप्याला म्हणेल, "अरे ....... (जे नाव असेल ते) तसाही आपल्या किचनचा काहीच युज नाही, आपण तिथं आणखी एक छोटंसं बेडरूम काढूयात का म्हणजे आपलं होणारं बाळ तिथं झोपेल?" ...