पोस्ट्स

सचोटी

*सचोटीची वृत्ती* *परवा एक अतिशय गरिब कुटंबातला माणूस आपल्या बायकोला घेऊन आला. पाच दिवस अॅलोपॅथी ट्रीटमेंट घेऊनही अजिबात फरक नव्हता. कंबर आणि उजव्या मांडीमध्ये पाय प्रचण्ड ठणकत होता. रुग्णेला नीट बसता येत नव्हतं की झोपता येत नव्हतं. चालतानाही वेदना होत असल्याने वाकून व कुणाच्या तरी आधाराने चालण बर्याच सायासानं जमंत होतं. अतिशय बिकट अवस्था होती तिची.* *घरची परिस्थिती खूपच गरिबीची. पेशंटचा नवरा मोलमजुरी करून घरातलं कसंबसं भागवायचा. "डाॅक्टर पाचशेच रुपये आणलेत" त्यानं तेही इकडून तिकडून गोळा करुन आणले होते. त्यांना धीर देऊन पैशाचा विचार आत्ता करू नका आपण आधी ट्रिटमेंट करू असं सांगितलं व ट्रिटमेंट चालू केली.* *कंबरेत व मांडीच्या दुखर्या भागात व्यधाग्निकर्म केलं. रुग्णेला काहीसं बरं वाटलं. विशेषत: कंबरेच्या वेदना बर्यापैकी कमी झाल्या होत्या परंतु मांडीतल्या वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यामुळं दुसर्या दिवशी सकाळी परत बोलावून स्नेहन-स्वेदन व मात्रा बस्ति दिला. कर्म झाल्यानंतर रुग्णेला बराच आराम पडल्याचं जाणवलं. हलल्यावर निघणार्या चमका बर्य...

उन्हाळ्यातली चर्या आयुर्वेदानुसार

आयुर्वेद उवाच्.....उन्हाळ्यातला आहार-विहार कसा असावा? अरे बाप रे!!!!! काय हा उकाडा. लू म्हणा किंवा उष्णतेची लाट म्हणा....सगळीकडे नुसता दाह. समजून उमजून निसर्गाच्या सुंदर क्रियाकलापात मानवानं केलेला बेसुमार हस्तक्षेप हा सर्व ऋतुचक्रच बदलताना दिसतोय. त्यामुळे आज वसंतातही ग्रीष्माचा ताप सहन.करावा लागतोय. परंतु निसर्ग हा त्याच्या चालीने चालतच राहतो. भारतासारख्या मौसमी प्रदेशात सर्व ऋतु परमोत्कट दिसतात. या ऋतुंचेच आयुर्वेदात व जुन्या शास्रांमध्ये ६ प्रकार समजून घेतलेले आढळतात. या ऋतुंमधलाच महत्त्वाचा ऋतु म्हणजे वसंत व यालाच इंग्रजीत स्प्रिंग असंही म्हणतात. नेहमीचा ऋतुकाळ पाहिला की लक्षात येतं की साधारण एप्रिल च्या मध्यापर्यंत वसंत असतोच असतो. चैत्रपालवी या वसंताची साक्ष देत असते तर कोकिळ हा आपल्या गायनाने वसंत उत्सव साजरा करीत असतो. बहाव्याची पानं पूर्णपणे गळून त्याला नखशिखान्त सोनेरी मनभावन पिवळ्या फुलांचा बहर साज चढलेला दिसतो. निसर्गाचे हे अवीट सौंदर्य केवळ अवर्णनीय. ही सर्व वस...

किचन

किचन लाॅकडाऊनमध्ये सगळंच बंद.  प्लंबरपासून न्हाव्यापर्यंत  आणि  भाजीवाल्यापासून हाॅटेलींगपर्यंत.  हाॅटेलींग.....  का तर काळाची गरज..  अन् दुसरं काय?  आजकालच्या माॅडर्न गृहिणी कामामुळं म्हणा, कंटाळा म्हणा किंवा जंक फुडचा जिभेला लागलेला चटका म्हणा आठवड्यातले फक्त सातच दिवसं बाहेरचं जेवण मागवतात.     पूर्वी तर बिचार्या नवरोबाला किंवा प्रत्यक्ष बायकोबाला सुद्धा पार्सलसाठी हाॅटेलांबाहेर गर्दी करावी लागायची. हे झोमॅटो आणि तत्समांनी बरोब्बर ओळखलं आणि पूढं घरच्या घरी या बायाबाप्यांची सोय करुन टाकली.        नीट पाह्यलं तर लक्षात येईल की या बायाबाप्यांनी हाॅटेलींगमधल्या कितीतरी संस्थांचा केवढा मोठा अर्थभार उचललाय. त्यामुळे भलेही किचन संकुचित झालं असेल पण चार माणसांची पोटं भरायला लागली हे बाकी खरं.       आणखी पुढे जाऊन मला तर वाटतंय कि एखादी बापडी आपल्या बाप्याला म्हणेल, "अरे ....... (जे नाव असेल ते) तसाही आपल्या किचनचा काहीच युज नाही, आपण तिथं आणखी एक छोटंसं बेडरूम काढूयात का म्हणजे आपलं होणारं बाळ तिथं झोपेल?"  ...

जीर्ण शाल उरे शेवटी

*जीर्ण शाल उरे शेवटी..... सुटे मग..* 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 *अजूनही लतादिदींची प्रत्यक्ष live ऎकलेली गाणी आठवतायत. १९९३-९४ च्या दरम्यान आळंदीला मराठी साहित्य संमेलनात अवघ्या ३०-४० फुटांवरून ऎकलेलं पसायदान तर पुण्याच्या एस्.पी. ग्राऊंडवर झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात ऎकलेली एकाचढ एक गाणी. त्यामुळे अशा दिव्यत्वाची प्रचिती याची देही याची डोळा घेतली यापेक्षा मोठं भाग्य ते आणखी कोणतं?* 🌹 *लता मंगेशकर एक गारुड* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *लता मंगेशकर घडत नसते तर लता मंगेशकर जन्माला यावी लागते. तीही कुठेतरी नाही तर फक्त अन् फक्त संगिताचा चिरंतन वारसा लाभलेल्या मास्टर दिनानाथांच्या घरात. ज्या घराच्या पायर्या सात सुरांच्या आहेत. ज्या घरातलं अवकाश सूर ध्वनींशिवाय काही जाणतंच नाही. ज्या घराच्या भिंती रागस्वरांच्या विविधांगी छटा लेवून देखण्या झाल्यात. तिथे जमिनीवरचे ही सूर आहेत व आकाशातलेही. मंद्रही आहेत व तारही. अशा घरात जगातला सर्वात तान्त व गोड स्वर घेऊन जन्माला यावं ते लतानेच.*  *कोण म्हणतं प्राक्तन नसतं?*  *कोण म्हणतं दैव नसतं?*  *मंगेशकर कुटुंबाकडे बघितलं की सहजंच उमगतं की हे सर्व का...

वात्सल्य कथा

अनुबंध           माणसानं दुध दुभत्यासाठी गाया म्हशी पाळल्या. शेतीसाठी बैलं पाळली. कोंबड्या, शेळ्या पाळल्या. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्याला चांगला आधार मिळाला. शेतीमध्ये असणारी अनिश्चितता या व्यावसायिकतेने काही प्रमाणात कमी झाली.            दुधासाठी पाळलेल्या गाया, म्हशी व माणूस यांच्यात सहवासाने काळानुरूप भावनिक बंधही निर्माण झाले. प्रेमाच्या माणसालाच कासेला हात लावू द्यायचा. प्रेमाच्या माणसानं दुध काढलं तरंच दूध भरपूर द्यायचं. असं हे माणूस व मुक्या प्राण्यांमधलं प्रेमाचं नातं खेड्यात गेल्यावर बर्याच ठिकाणी पहायला मिळतं.         या जवळकीचं वात्सल्याचं प्रतिक अभिव्यक्त करणारी गोष्ट माझ्या मोशीच्या आजीच्या बाबतीत घडली होती. मला तीनं ती प्रेमानं व अभिमानानं सांगितली. इतरांपेक्षा खूप वेगळी म्हणूनंच मला ती खूप विशेष वाटते.                मृत्यू व जीवनाच्या दारातली ही गोष्ट. कड्याच्या टोकाला सर्व पायंच हवेत व फक्त अंगठा कड्याच्या टोकावर असेल तर जीवाची काय अवस्था होईल त्या सीम...

फर्गसन कथा

फर्गसन कथा त्यादिवशीची रात्र जरा जास्तंच भयाण वाटंत होती. चंद्र डोक्यावरही नव्हता आणि लांबवर क्षितिजावरही.             शंभरहून जास्त वर्षे पुराणं फर्ग्युसन काॅलेजचं होस्टेल. त्या आसमानी काळ्याकुट्ट वातावरणात अगदीच भितीदायक वाटंत होतं. चारही बाजुंनी दगडी चिर्यात बांधलेल्या दुमजली खोल्या हळूहळू अंगावर आल्यासारख्या वाटंत होत्या. खोल्यांच्या एकेका भिंतीची जाडी ३-३ फुट. मध्ये मोठा चॊक. वसतीगृहाच्या बरोबर मध्ये एक जुनं काहिसं वठलेलं नींबाचं झाड.  उत्तर व दक्षिण दिशेला एक एक मोठा दिंडी दरवाजा. वसतीगृहाच्या दक्षिण दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला पार आतल्या कोपर्यात एकाकी असल्यासारखं न्हानीघरं व स्वच्छतागृहं.         वसतीगृहात जवळ जवळ शे दोनशे खोल्या. एखाद्या तुरंगासारखं किंवा चॊकाच्या वाड्याला शोभावं असं वास्तुशिल्प. दिवसा तेवढंच सुंदर पुरातन वारसा म्हणून शोभणारं. इंग्रजांच्या काळात सावरकरांसारखे मोठेमोठे स्वातंत्र्य सेनानी तिथे रहायला होते, शिकायला होते. बर्याच मोठ्या कारकिर्दिंना, इतिहासाला साक्षी अशी या होस्टेलची ख्याती होती. ...

ते

 काही दिवसापूर्वी चिंचवडच्या मोरया गोसावी गार्डनच्या बाहेर एक साठी पार केलेले काका चना वगैरे वगैरे जिनसांची गाडी घेऊन उभे होते. अंगातल्या मळकट कपडयांवरून त्यांची परिस्थिती फारशी बरी नाही हे कळंत होतं. हातगाडी सुद्धा त्यांच्या वयानुरूप त्यांची सोबत करंत जुनी झाली असावी.. हातगाडीवरची फाळकी झीजूनझीजून तुळतुळीत गुळगुळीत पाॅलीश केल्यासारखी झाली होती. तो तुळतुळीत गुळगुळीतपणा काकांच्या सोबतीची साक्षच देत होता. हातगाडीच्या फडतारावर चने, फुटाणे, भेळ, शेव, गरमगरम चवीष्ट बाॅईल्ड स्वीट कार्न वीथ चवीष्ट मसाला असं सगळंच रेलचेलून भरलं होतं. थोडं अनहायजेनिक होतं पण त्यात एक वेगळाच अोलावा होता, मायेचा! येणारा जाणारा ओळखीचा त्यांच्या गाडीवरून जाताना चनेफुटाणे तिर्थरूपांचा माल असल्यासारखा मुठीत भरून घेऊन जात होता आणि ह्या काकांचाही बापासारखा चेहर्यावरचा आनंद तसाच वाहून रहात होता. मी, बायको आणि माझी मुलगी चिनू मंदिरातून आल्यावर आम्हाला मस्त चटपटीत काहीतरी खावंसं वाटंत होतं. त्यात काकांची गाडी समोर दिसली. तोडांला एकदा पाणी सुटलं की कसलं हायजीन अन कसलं काय. आम्ही स्वीट काॅर्न वीथ मसा...