वात्सल्य कथा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अनुबंध
माणसानं दुध दुभत्यासाठी गाया म्हशी पाळल्या. शेतीसाठी बैलं पाळली. कोंबड्या, शेळ्या पाळल्या. शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकर्याला चांगला आधार मिळाला. शेतीमध्ये असणारी अनिश्चितता या व्यावसायिकतेने काही प्रमाणात कमी झाली.
दुधासाठी पाळलेल्या गाया, म्हशी व माणूस यांच्यात सहवासाने काळानुरूप भावनिक बंधही निर्माण झाले. प्रेमाच्या माणसालाच कासेला हात लावू द्यायचा. प्रेमाच्या माणसानं दुध काढलं तरंच दूध भरपूर द्यायचं. असं हे माणूस व मुक्या प्राण्यांमधलं प्रेमाचं नातं खेड्यात गेल्यावर बर्याच ठिकाणी पहायला मिळतं.
या जवळकीचं वात्सल्याचं प्रतिक अभिव्यक्त करणारी गोष्ट माझ्या मोशीच्या आजीच्या बाबतीत घडली होती. मला तीनं ती प्रेमानं व अभिमानानं सांगितली. इतरांपेक्षा खूप वेगळी म्हणूनंच मला ती खूप विशेष वाटते.
मृत्यू व जीवनाच्या दारातली ही गोष्ट. कड्याच्या टोकाला सर्व पायंच हवेत व फक्त अंगठा कड्याच्या टोकावर असेल तर जीवाची काय अवस्था होईल त्या सीमेपर्यंत नेणारी गोष्ट. पुढच्या क्षणाला मृत्युचीच शक्यता परंतु तरीही दैवाच्या अगाध लीळेने किंवा प्रारब्धाच्या प्रतिभावंत लेखणीने काय वेगळेच रचले होते, लिहिले होते आणि हे नक्कीच सामान्य नव्हते हे सांगणारी कहानी. वात्सल्याच्या आत्तापर्यंतच्या साठलेल्या शक्तिच्या उद्रेकानं मरणाच्या दारात चाललेली आजीची गाय "अंजली" कशी परत आली याचं स्मरण जरी झालं तरी आजही काळीज हेलावतं.
आमच्या आजीकडं म्हणजेच आईच्या आईकडं दोन गाया व पाच बैलं होती. दररोज त्यांना दाणापाणी घालणं, त्यांचं शेण-मूत्र साफ करून स्वच्छता करणं यासारखी कामं आजीच करायची. सकाळी संध्याकाळी दुभत्या गायांचं दुध काढण्याचं काम मामा करायचा.
आजीकडं एक कसदार दूध देणारी ७०% गावरान गाय होती. तीचं नाव आजीनं प्रेमानं 'शीतल' ठेवलं होतं. मामा सकाळ संध्याकाळ बादली बादली दूध काढायचा. दूध खुपंच चविष्ट असायचं. नुकतंच काढलेलं धारोष्ण दुध व त्या वरचा फेस प्यायचा आनंद अवर्णनीय असायचा. धारोष्ण दुधाला अमृत का म्हटलंय हे ते प्यायल्यावरंच कळू शकतं.
साधारण एक दिड वर्षाला गायांचं वेत होतं. दुसरं वेत येईपर्यंत गाया दूध देत रहातात. परंतु नंतर दुधाचं प्रमाण कमी होत जातं. पुन्हा वेत झाल्यावर नव्या दमानं गाया पुन्हा दूध द्यायला लागतात. अशीच एका वर्षी शीतल व्यायली होती. चांगलं दुध येत होतं. महिनाभर शीतलनं चांगलं दूध दिलं. पण दैवाचा योग काही वेगळाच होता. शीतलचं मातृत्व दैवानं हिरावून घेतलं. तीचं वासरू एका महिन्यातंच कुठल्या तरी आजारानं गेलं. शीतल वासरासाठी सैरभैर झाली. तीचं वात्सल्यं वेडं झालं. तासंन तास तिचं हंबरणं पोटात गोळा आणायचं. वासरू समोर दिसत नव्हतं म्हणून तीचं सगळंच दूध आटायला लागलं. शेवटी मामानं पुरलेल्या मेलेल्या वासराला बाहेर काढून त्याच्या कातडीत कुणाकडून तरी भुसा भरून घेतला आणि ते शीतलपुढं उभं केलं तेव्हा शीतल शांत झाली. तिचं वात्सल्य परंत आनंदून गेलं आणि उभ्या न हलणार्या निर्जीव वासराला चाटता चाटता तीच्या आचळातून परंत स्नेह पाझरू लागला. मेलेल्या वासराला बघून तिच्यातली आईची माया समाधान पावली. बुद्धी नसली तरी नात्यांमधलं प्रेम हे तर तिच्या ठायी होतंच होतं.
असंच एके वर्षी शीतलला परंत एक वासरू झालं. दिसायला फारंच सुंदर. काळपट चाॅकलेटी रंगाचे चमकदार केस, त्यावर पांढर्या केसांची छोटी छोटी सुंदर बेटं. त्यामुळं पहाणारा शीतलच्या हरणासारख्या दिसणार्या अवखळ वासराकडं कॊतुकानं पहात रहायचा.
अशा सुंदर वासराच्या बाल लीला म्हणजे चांचल्य, क्रिडा आणि आनंद यांचा सुरेख संगम होता. मध्येच भूक लागली की शीतलकडे पळंत जायचं. तोंडाने शीतलच्या कासेला ढुसणी देत दूध प्यायचं. शीतलला सुद्धा बर्याच वेळा चांगलाच हिसका बसायचा. पण तरीही दुध पिणार्या आपल्या पिल्लाला चाटून चाटून लख्ख करायची.
शीतलच्या वेताला आता जवळ जवळ एक महिना उलटून गेला होता. वासरू थोडं शांतं झालं होतं. तरी थोडा अवखळपणा होताच. पण त्याला मोकळं सोडलं तरी त्याचा त्रास असा काहीच नव्हता. आजीचा वासरावर महिनाभरात चांगलाच जीव जडला होता. त्यामुळं प्रेमानंच आजीनं वासराचं नावही ठेवलं "अंजली". तिचं दाणापाणी सगळं व्यवस्थित होत होतं. आजी नेहमी म्हणायची आत्ता हिचं दाणापाणी व्यवस्थित झालं तर पुढं ती चांगलं दूध देईल.
हळू हळू अंजली वयात आली. तिची सुंदर सुलक्षणी कालवड झाली. मोठी झाल्यानंतर अंजलीला चांगली कास धरली. अंजली चांगलं दूध देणार याचे ते शुभ संकेत होते. अंजली गुणांनी पण तशी उजवीच होती. तिनं कुणाला मारणं तर सोडा पण कधी शिंगं सुद्धा दाखवली नाही. त्यामुळंच अंजलीचं आजीकडून लाडाकोडानं पालन पोषण चालू होतं. आजी तिच्याशी माणसासारख्या गप्पा मारायची. अंजली सुद्धा आजीची भाषा कळल्यासारखी करायची. मायेचा स्पर्श तीला कळायचा. वाणी नसली तरी डोळ्यांनी बोलायची. लाडानं मानेखालची पोळी खाजवली की मान वर करून डोळे बंद करून त्या स्पर्शाचा आनंद घ्यायची. आजीच्या संवेदना तिच्या आतपर्यंत भिडायच्या. स्नेहानेच तिच्या खरखरीत जिभेनं आजीचा हात चाटून काढायची. असा आगळा वेगळा प्रेमाचा अविष्कार नेहमीच पहायला मिळायचा.
पण.....पण अशी प्रेमाची गणितं आयुष्यभर चालतात असंही नसतं. काळरात्रीसारखी वादळं येतंच असतात. दिवसाच्या उजेडानंतर तिमिर दाटतोच तर तिमिरातून सुद्धा तेज फाकतेच. असाच तिमिराचा काळ आला.
हाच तिमिराचा काळ आजीच्या कुटुंबावर किंबहुना जवळ जवळ सर्वच महाराष्ट्रावर गुदरला. १९७२ चा भयंकर दुष्काळ. पाणी नाही, खायला अन्न नाही. पाऊस नाही त्यामुळं गवत सुद्धा उगवलं नाही. लाल हायब्रीड ज्वारी रेशनिंगवर मिळायची. त्याच्या भाकरी नाहीतर आंबाड्याच्या भाकरी असं अन्न खावं लागायचं. हे अन्न गळ्याखाली उतरायचं नाही पण जगण्यासाठी, काळ निभावून नेण्यासाठी पोटात ढकलणं भाग होतं. सगळीकडं असाच हाहाकार उडाला होता. सृष्टी सर्वांवरंच जशी कोपली होती. निसर्ग तेजोहिन वाटंत होता. सूर्याची तळप दुष्ट तेजासारखी होरपळून काढंत होती. विहिरिंनी तळ गाठला होता. खरडून खरडून बायका माणसं पाणी भरंत होती. लाही लाही होणार्या निसर्गात माणसं व प्राण्यांची शरीरं कशीबशी तग धरून होती.
अशात आजी गायांसाठी हुडकून हुडकून गवत शोधून आणायची. कधी आपल्यातलीच हायब्रीड बाजरी पण त्यांना खायला घालायची. पण नंतर नंतर गुरांना असं सांभाळणं तिला फारंच अवघड जाऊ लागलं. गवत संपलं. माणसांना सुद्धा पाणी दुरापास्त होऊ लागलं. लोकांची गुरं तिच्यासमोर मरत होती. पुढच्या डोंगरावर लांबून सुद्धा दिसतील एवढे मेलेल्या गुरांचे ढिग पाहून आजीच्या कळजात चर्र व्हायचं. काय करायचं हा फार मोठा प्रश्न तिच्या पुढं होता. अन्न पाण्यावाचून तिला तिच्या लेकरांना मरताना बघायचं नव्हतं. त्यातल्या त्यात अंजलीवर तिचा भारी जीव. रात्र रात्र आजी विचार करंत रहायची. त्यातंच तिला एक उपाय सुचला. हा उपाय तिला तिच्या शीतलपासून तोडणारा होता पण शीतललाच जगवण्यासाठी तो निर्णय घेणं भागही होतं. माणसं, त्यांना पाणी, अन्न कमी लागतं त्यामुळं ती कशीही जगतील पण प्राणी जगणं व जगवणं सोपं नव्हतं. दिवसाला एका गायीला ३० लिटर तरी पाणी लागतंच लागतं. हा हिशोब, गवताचा हिशोब त्यावेळच्या व्यवहारात जुळणारा नव्हता. काही गुरांना कसंबसं निभावून नेता येईल पण सगळ्यांचं कसं होणार?
त्यामुळंच आजीकडून तो कठिण निर्णय घेतला गेला.
राजगुरूनगरच्या पश्चिम मावळ पट्ट्यात थोड्याफार प्रमाणात पाणी होतं. गुरं, माणसं पावसाळ्यापर्यंत काटकसरीनं कसंबसं निभावून नेऊ शकतील अशी काहिशी बरी परिस्थिती होती. त्याच पट्ट्यात आजीचे एक नातेवाईक गृहस्थ होते. त्यांना सकाळीच बोलावून अंजलीला घेऊन जाण्याबद्दल विचारलं. त्यांच्याकडं पाणी असल्यानं त्यांनीही आनंदानं होकार दिला. दुसर्या दिवशी टेम्पो आणतो म्हणून ते गृहस्थ निघून गेले. संध्याकाळ पर्यंत आजीच्या जीवाची घालमेल चालली होती. डोळ्यात पाणी होतं. अंजलीला सारखी जाऊन प्रेमानं गोंजारायची. ती सुद्धा चाटायची. त्यांचा प्रेमळ वार्तालाप बराच वेळ चालू होता. पण अंजलीला माहित नव्हतं की तिचा या घरातला शेवटचा दिवस आहे. आजीनं जमेल तेवढं फिरून चारा गोळा केला, पाणी आणलं व तिच्यापुढे ठवलं.
रात्र झाली. आजीला झोप येईना. सारख्या अंजलीच्याच आठवणींनी तिच्या मनात काहूर माजलं होतं. पण तिला जगवण्यासाठी तिला धाडणं गरजेचंही होतं शिवाय अंजलीला भेटायला ती कधीही जाऊ शकणार होती या विचारानं ती कशीबशी शांत झाली.
सकाळ झाली. दुसरा दिवस उजाडला होता. सकाळी सकाळी परत आजीनं जमेल तेव्हढं अंजलीला खायला घातलं. आजीनं अंजलीकडं पाहता पाहताच तिच्या डोळ्यात आसवं आली. त्या दावणीला अंजली आता तीला कधीच दिसणार नव्हती.
थोड्याच वेळात त्या गृहस्थांनी मोठा टेम्पो आणला. घरातल्या सगळ्यांनीच अंजलीला जड अंतःकरणानं निरोप दिला. घरचं वासरू, लहानाचं मोठं ज्या अंगणात झालं, ते आंगण सोडून निघालं होतं. अंजलीचा कासरा आजीनं रडू दाबतंच त्या गृहस्थाच्या हातात दिला व तो गृहस्थ तीला टेम्पोकडं अोढू लागला. पण अंजली सर्व शक्तिनीशी प्रतिकार करू लागली. तीला जायचं नव्हतं. एखाद्या लहान मुलासारखी तीही हट्टाला पेटली होती, त्या गृहस्थाबरोबर जायला अजिबात तयार नव्हती. शेवटी मामानंच तिचा कासरा हातात घेऊन कशीबशी तीला टेम्पोत कोंबली. टेम्पोत सुद्धा अंजली फारंच सैरभैर झाली होती. पण तीला चांगलंच बांधून जखडवून टाकलं होतं.
तो गृहस्थ नमस्कार करून निघाला. जाणार्या त्या गृहस्थाला आजीनं भरल्या डोळ्यांनी अंजलीला नीट सांभाळण्याची विनंती केली. तो गृहस्थ टेम्पोच्या पुढच्या सीटवर बसला व टेम्पो आपल्या दिशेने धावंत सुटला. पाठमोर्या टेम्पोकडं व आत दिसणार्या तीच्या अंजलीकडं आजी डोळ्यापलिकडं जाईपर्यंत पहात होती. भरल्या डोळ्यांनी अंजलीला निरोप देऊन आजी पाठमोरी झाली.
बरेच दिवस आजीला व घरच्यांना अंजलीची आठवण येत होती. आजीच्या मनात खोल कोरलेल्या अंजलीच्या आठवणी. केवळ त्यावर काळाचा धुराळा बसत होता. पण मनाच्या अंतर्गर्भात त्या तशाच जपून राहिल्या होत्या. कदाचित ते काम नंतर नियतीला स्वतःला करायचं होतं. तो आश्चर्याचा झटका देणारा परिच्छेद नियतीला स्वतःच लिहायचा होता.
पावसाळा आला. चांगला पाऊस सुरू झाला. सृष्टि पाण्यानं भिजून वाहिली. तहानेलेल्या मातीच्या अगदी आतल्या कणा कणापर्यंत पाणी पोहिचलं. दुष्काळानं डोळ्याचं सुद्धा वाळवंटं झालं होतं. त्या डोळ्यात पावसाच्या पाण्याची ओथंब मनाला सुद्धा चिंब करीत गेली. करपलेल्या धरित्रीच्या कुशीतून हिरवे अंकुर अलगद बाहेर पडले. सगळीकडं हिरवंगार झालं. सर्व सृष्टी, माणसं, प्राणी आनंदानं नाचू लागले. इतक्या दिवसांची प्रतीक्षा त्यानंतर आलेलं हे जलवैभव यानं सारेच कसे हरखून गेले होते.
आजीकडं अजूनही दोन गाया व पाच बैलं कशीबशी कोरड्या चार्यावर तग धरून जगवली होती, जगली होती. कोरडा चारा, अगदी थोडं पाणी मिळाल्यानं कष्टानं तग धरलेली गुरं पारंच रोडावली होती. इतक्या दिवसात नशिबात नव्हता असा हिरवा गार चारा समोर आल्यानं बैलांनी आधाशासारखा खाल्ला. इतक्या दिवसाच्या कोरड्या पोटात हिरवा चारा बैलांनी एकदम ढकलला. तो खाऊन पाचही बैलं तडफडून मेली. काय झालं कुणाला काहीच कळलं नाही. आत्तापर्यंत कष्टानं जपलेली बैलं अशी हाकनाक गेली हे पाहून आजी व सगळेच खुप हळहळले. चांगल्या पावसानं परत जीवन सुरळीत होईल, गुरं जगतील हि पल्लवीत झालेली आशा आशाच राहिली. परंतु नियतीची क्रूर थट्टा करून झाली होती. पण गावातली जगलेली सगळीच जनावरं हिरवा चारा एकदंम खाऊन पटापट मरत होती. नियती सगळीकडंच आपला हात दाखवंत सुटली होती. पुढच्या डोंगरावर परत मेलेल्या जनावरांचा ढिग लागला आणि त्याचा उग्र दर्प कित्येक महिने आजीला, घरच्यांना व आख्ख्या गावाला, पोटच्या पोरासारखी जपलेली जनावरं कशी डोळ्यादेखत तडफडून मेली याची करूण आठवण करून देत राहिला.
अंजलीला देऊन आता जवळ जवळ चार महिने तरी झाले होते. आजीच्या मनाची ती जखम हळुहळू भरंत आली होती. अंजलीची आठवण सुद्धा पुसट झाली होती. तिला एका चांगल्या घरी पालनासाठी दिलं याचंच समाधान आजीच्या मनात होतं. आणि ती तिच्या निर्णयाबद्दल समाधानीही होती.
पण एके दिवशी अघटितंच घडलं. शनिवार होता. सकाळची कामं आजीनं आटोपली. जेवणं उरकली आणि दुपारच्या वेळी घरासमोरच्या कट्ट्यावर बसली होती. आणि तिला एकदम माणसांचा गलका ऎकू आला. आवाजाच्या दिशेनं आजीनं पाहिलं
तर.....
तिची......होय तिचीच अंजली!
फेसाळलेल्या तोंडानं, जीवाच्या आकांतानं आजीकडं पळंत येत होती. ती तडक आजीच्या जवळ येऊन उभी राहिली. आजीचा तिच्या डोळ्यावर विश्वासंच बसत नव्हता. "हि इथं आली कशी?" चं भलं मोठं प्रश्न चिन्ह आजीच्या तोंडावर होतं. पण कोणाला विचारणार?
तशातंच आजी तीला प्रेमानं गोंजारायला लागली. इतक्यात तिथं दोन माणसं काठ्या घेऊन आली. आजीनं नीट पाहिलं तर अंजलीच्या पायांवर व पाठिवर काठीचे वळ उठले होते. तिच्या मुरखीची दोरी अर्धवट तुटली होती. आजीनं तिच्या अंजलीला कधी चापटही मारली नव्हती. मायेनं फक्त थोपटलं होतं. पण या राक्षसांनी अंजलीवर खुप अत्याचार केले होते. ते पाहून आजीला रडूच कोसळलं.
त्या माणसांनी आजीकडं गाय मागितली. अंजलीची अवस्था पाहून अाजीच्या रडण्याचं रुपांतर क्षणात महाकालीच्या रागात झालं. हे रूप पण काय असू शकतं याची चांगलीच प्रचिती समोरच्या माणसांना आली. तिचा राग बघून ते दोघे घाबरून दोन पावलं मागे झाले. आजीनं थोडं शांत होत विचारलं की ही गाय तुमच्याकडं कशी आली? त्यावर त्यांचं उत्तर ऎकून आजी व घरचे सगळेच सुन्न झाले.
ज्या गृहस्थाला आजीनं गाय दिली होती त्या नराधमानं ती चाकणच्या शनिवारच्या बाजारात पिंपरीच्या कसायाला विकली होती.
शनिवारच्या बाजाराला अशी अनेक भाकड, चांगली गुरं हे कसाई दर शनिवारी खरेदी करायचे व त्या गुरांचे गळे जवळ जवळ बांधून चाकणवरून त्यांना निर्दयपणे मारत मारत भर रस्त्यावरून पिंपरीला आणायचे आणि पिंपरीच्या पुलाखाली....
असंच अंजलीला सुद्धा सगळ्या गुरांबरोबर नेत पिंपरीला नेत होते. नेत असताना अंजली नेमकी मोशीला आजीच्या घरावरूनंच जात होती. तीला बहुतेक अगदी कडेला बांधलं होतं. आपलं स्वतःचं घर आलंय हे तिनं चटकंन अोळखलं अन् तेव्हा अंजलीनं सर्व ताकदीनीशी तीची सर्व बंधनं तोडली आणि तडक आजीकडं पळंत आली. हि बंधनं तोडणं एवढं सोपं नव्हतं. पण आजीच्या व घराच्या वात्सल्याच्या ताकदीमुळे ती बंधनं अंजली तोडणं तीला शक्य झालं.
हे सर्व ऎकून आजी सर्दंच झाली. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिने स्वतःला सावरून त्या कसाबांना ठणकावून सांगितलं की तिच्या गाईला हात जरी लावायचा प्रयत्न केलात तर याद राखा. त्यांचा नाईलाज झाला व ते परतले. कदाचित त्यांनी सुद्धा असा प्रसंग पहिल्यांदाच पाहिला होता. आजीनं पाणावलेल्या डोळ्यांनीच अंजलीला कुरवाळलं.
पण आजीचा राग काही अजून गेला नव्हता. दुसर्या दिवशी आजीनं अंजलीला आतल्या गोठ्यात बांधलं व त्या गृहस्थाला भेटीसाठी बोलावून घेतलं. गृहस्थं आल्यानंतर त्याला अंजलीची चॊकशी करण्याचं नाटंक केलं. आजीच्या नजरेला नजर न मिळवताच त्यानं आजीला खोटिच अंजलीची खुशाली कळवली. त्याच्या खोटेपणामुळे आजीच्या रागाला तर पारावार राहिला नाही. तिनं मामाला अंजलीला घेऊन यायला सांगितलं. अंजलीला समोर बघून तो गृहस्थ चांगलाच चपापला. रागानं लाल झालेल्या आजीनं त्या गृहस्थाची शालजोडितल्या शब्दांनी तीथेच यथेच्छ धींड काढली. आजीचा तो दुर्गावतार पाहून तो गृहस्थ चांगलाच घाबरला व त्याच्या दुकानाला काठी लावून म्हणा किंवा पायात शेपटी घालून कुत्र्यासारखा पळून गेला.
आजीच्या ह्रदयाला समाधान मिळालं. अंजली जर ती बंधनं तोडू शकली नसती तर किंवा तीला मध्येच बांधून नेलं असतं तर? ती कुठे आहे याचा पत्ता आजीला जन्मभर लागला नसता. पण शेवटी अंजलीचं आजीवरचं प्रेम त्या प्रेमाची सत्त्व परिक्षा यातून अंजलीचं नशीब तावून सुलाखून बाहेर आलं होतं. नियतीला कदाचित हेच तर लिहायचं होतं.
पण....अशा कितीतरी अंजली असतील की ज्या आपल्या नकळंतच कुर्बान होत असतील. असंच जगातील प्रत्येक अंजलीवर प्रत्येकानं असंच प्रेम केलं तर जगात खर्या वात्सल्याचा उगम व्हायला वेळ लागणार नाही. व नियतीलाही असं लिहायची वेळ येणार नाही.
डाॅ. अतुल काळे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा