गणिका
वेश्या हा विषयंच मुळात थोडा अवघडवणारा. कदाचित या शब्दाच्या वेगळेपणातून, त्यामागच्या आकलनातून थोडी विचित्रभावना निर्माण होते खरी. त्यामुळेच त्यातल्या त्यात त्याच्यासाठीचा सुसंस्कृत असा शब्द 'गणिका' वापरल्यास त्या शब्दाची तीव्रता न जाणवता काहीतरी लिहिता येऊ शकेल.
तर 'गणिका' या पूर्वापार काळापासून चालत आलेला समाजाचा अविभाज्य भाग. अगदी गुरूचरित्रातही त्यांचे दाखले मिळतात. 'मनाने पवित्र असलेल्या गणिकेला कुलिन व देवाधिकांची कर्मकाण्डं करणार्या पवित्र विवाहित स्रीच्या तुलनेत उच्च गती मिळाली होती' असा तो दाखला. पण तरिही गणिका हा विषयच मुळात अनेक प्रश्न घेऊन येतो व त्याची उत्तरंही कदाचित कोणालाच माहीत नसतात. तेव्हा पहिला प्रश्न हा पडतो की गणिकांची खरंच समाजाला गरज आहे का? तर आगतिकपणे जगणार्या स्रीयांकडे पाहिल्यावर याचे उत्तर नाही असेच येते. समाजातल्या काही घटकांच्या अनियंत्रित लिंगपिसाट वृत्तीचे, उर्जेचे साधन म्हणजे या गणिका. स्वतःचं स्वत्व लोपवून सर्व संसारसुखांचा अपरिमित त्याग करून समाजाच्या अनिर्बंध वासनापूर्तीस सज्ज राहणार्या या गणिका म्हणजे सगळ्याच समाजासाठी एका लांच्छनासारख्याच आहेत. हा गणिकांचा दोष नसून, तश्याच त्या लांच्छनही नसून समाजातली ततसंलग्न प्रवृत्तीच समाजास लांच्छन आहे.
स्रीपुरूषांच्या ठायी असणार्या नैसर्गिक वासनेस 'नितिमत्तापूर्ण, सुसंस्कृत' असा आशय पूर्वकालीन समाजाने विवाह संस्थेतून दिला. 'प्रेम, विश्वास, जबाबदारी' या सर्व मूल्यांची बैठक असलेली विवाह ही संस्था नैसर्गिक काम उर्जेस प्रेम, विश्वासादी मूल्यांमधून एका सुंदर, प्रशस्त मार्गावर आणून ठेवते. परंतू आजचा समाज 'तीच नार, तीच सतार, तीच तार' असं काहीतरी म्हणून वेगळ्या सतारीच्या शोधात निघून त्यातल्या काहीजणांना ती सतार एखाद्या गणिकेच्या घरीच मिळून जाते. त्यांच्या कामवासनेस एकसुरीपणा मान्य नसतो आणि त्यातूनंच असा प्रमाद घडतो व गणिका ही संस्था आणखी पुष्ट होत जाते.
अशा गणिकांचं सर्वनाम उच्चारलं तरीही चार चौघात उच्चभ्रू समाजाच्या कानामध्ये कुठल्या तरी गर्रम जातीचं रसायन पडावं आणि त्याने त्या पद्धतीने चेहर्यावरच्या रेषा बदलण्याचा निदान अभिनय तरी करावा. ताडीच्या झाडाखाली दुध पिणारा पैलवान येणार्या, जाणार्या, पहाणार्यांच्या मते ताडीच पित असतो तसंच काहीसं इथेही. त्यामुळेच सभ्य समाजात या विषयावर आपसूकंच हात कानावर जातात आणि या गणिकांसाठी काहीतरी करणार्याला तर वाळीतंच टाकलं जातं. परंतु दूरून डोंगर साजरे करणारा आपला समाज कुष्ठ रोग्यांसाठी काम करणार्या आमट्यांनाही नडला होताच. सावित्रीबाईंच्या वाटेत याच नतध्रष्ट समाजाने काटे पेरले होते. शेवटी काय तर वेगळ्या वाटा एका वेगळ्या कल्पनेतून चोखाळणार्या लोकांना चांगलं म्हणायचं नसतं हे समाजाला चांगलंच ठाऊक असतं आणि हीच आपल्या समाजाच्या विचारांची वहिवाट. परंतु या विचारांनाही न जुमानता वेगळ्या वाटेने जाणारे व त्यांना पाठिंबा देणारे, बोटावर मोजता येण्याएवढेच जरी असले तरी ते अाहेत व त्यांच्यामुळेच आपला समाज बौद्धिक, प्रागल्भिक कसोट्यांवर कासवाच्या गतीने तरी प्रगती करतोय असं म्हणण्यास वाव आहे इतकं सारं लहान व लहान असलं तरी महान. त्यामुळेच या बोटांवरच्या लोकांसाठी थोड्या टाळ्या झाल्याच पाहिजेत, मनातून वाजवल्या तरी चालतील किंवा केवळ 'व्वा, ग्रेट' असं काहीतरी म्हटलं तरी त्रिवार अॅक्सेप्ट.
आम्हाला एकदमंच साधा वाटणारा आमचा एक मित्र मागे बुधवार पेठेत फेरफटका मारून आला. आम्ही अौषधे भरायला लागणार्या बाटल्या आणायला कधीमधे बुधवारात जातो आणि इकडेतिकडे न पहाता परत तसेच कोरे परंत येतो. त्याच शुभ्र काॅलरीचा आम्हाला अभिमान. परंतु हे महाशय तडक गणिकालयात प्रवेश करते झाले आणि तरिही ते 'कोरेच राहिले, पवित्र राहिले' हे विशेष आणि त्याची खात्रीही नक्कीच वाटते कारण त्याच्या बोलण्यातून तसं जाणवलंही. त्या गणिकांच्या जीवनाचा त्याला आभ्यास करायचा होता आणि त्यानं तो त्याच्या कक्षेत केलाही.
या जगात बरंच काही असंही असतं की जे केवळ ऎकीव असतं व आपण त्याच ऎकिवावर आपलं मत आजन्म सांभाळतही आलेलो असतो. कदाचित सभ्य समाजात बरंच काही ताडीच्या झाडाच्या खालच्या जागेसारखं ठामपणे वर्ज्यही असतं. मग त्या जगातल्या विषसमान वाटणार्या विषयाच्या वाटेला तरी कोण जाणार?
पण काहीजण निर्हेतुकपणे काहीतरी करीत असतात व या पठ्ठ्याने काहीसं तसंच केलं. त्यानं गणिका विषयाचा गणिकांमध्ये जाऊन आभ्यास केला. त्यांना बोलतं केलं. त्यात त्याला जे काही कळालं, उमगलं ते एका विचित्र, विलक्षण, दुर्लक्षित समाजाच्या एका विपन्न अंगाचं दर्शन होतं. कितीही व्यभिचारग्रस्त (तीच्यावर व्यभिचार थोपलेला असतो म्हणून) ती वाटली, हीन वाटली तरी शेवटी ती एक स्रीच. प्रत्येक स्रीची कहानी वेगळी, अगदी एखादं पुस्तक लिहावं इतकी करुण व खोलवर रूजलेली. कधीकधी चांगल्या बीजांनाही दुःखाचं खतपाणी घालून एका वेगळ्या संस्थेसाठी तयार केलं जातं आणि ते बीजंच त्याप्रकारचं होतं हे ठासवलंही जातं. खरं तर या सगळ्या गोष्टींवरून एक जाणिव मात्र नक्की झाली की या सगळ्याच्या मुळाशी नामानिराळा राहणारा सो काॅल्ड चांगूलपणाचा बुरखा ल्यालेला समाजच आहे. 'बेवारस असलेल्या पोरी', 'एखाद्यानं आपल्याच दूरच्या नात्यातून फसवून आणलेली एखादी गरीब पोर' हे कमी की काय म्हणून याच समाजातल्या निर्ढावलेल्या लोकांनी पैशासाठी स्वतःची बहिण, बायको, मुलगी यांनाही कुंटणखान्याच्या धंद्याला लावलं, हे ऎकूनही न पटणारं वास्तव समोर आलं. माणसांचं जनावर म्हणूनही एवढं अधःपतन होऊ शकत नाही तेवढं या माणसांनी करून दाखवलं आणि इथे मानवानं शास्रज्ञांच्या बौद्धिक उत्क्रांतिलाही मागे टाकलं. त्यांच्या मनाच्या गटारात रेंगणार्या लोभी किड्यांनी पैशासाठी नितिमत्ता वेशीला टांगून तोंडं वर काढली आणि लाळ गाळंत या संस्थेचा परिपोष केला. पैश्यासाठी निर्घृणपणे मारून लटकवलेल्या बोकडासारखं त्यांचं आयुष्य झालं. जगणं तर असतं पण जिवंतपणा नसतो, चैतन्य नसतं. अब्रुची कातडी सोलून वासनेच्या बाजारात लटकवलेली ती भावनाशून्य जिवंत प्रेतं वासनेच्या सुरीने लचके तोडतोड तोडून उपभोगली गेली. पण कालांतरानं मात्र उरली फक्त उरलेल्या आयुष्याची अश्रुंमध्ये भिजलेली राख.
तारुण्य हे समाजाच्या वासनेला किरकोळीत विकंत आलेल्या गणिका समाजाच्या वासनेच्या गुलाम होऊन जगंत असतात. त्यांचं पोटंच वस्तुतः वासनेचं गुलाम. दिवसा रात्री येणारे डबे, त्यात असलेले शिळ्या भाकरीचे पोळीचे तुकडे, कधीकधी त्याबरोबर आलेली पाण्यासारखी आमटी, कधी भाजीला लागलेला आंबुस वास असं अन्नं. राहण्यासाठी जुनाट कळकटलेल्या खोल्या. याबरोबर स्वतःचं शरीर. या सर्व भांडवलावर मिळणारे चारदोन पैसे, ज्यांनी या धंद्याला लावलं त्यांना नित्यनेमाने पाठवायचे. असं सगळं राजरोस, नित्य चाललेलं. आयुष्य आहे म्हणून जगावं लागतं. जीवनात नाविण्य ते काय? एखादा येतो, स्वतःची तहान भागवतो, आणि आपला रस्ता धरतो. वर्षानुवर्षं असंच चाललेलं. हळूहळू तारुण्य सरतं. नंतर माणसंही विचारंत नाही व समाजही स्वीकारंत नाही. आयुष्य एखाद्या वाळवंटासारखं विराण होऊन जातं.
हे सर्व वास्तव ऎकलं की माणूस किती स्वार्थी आहे याचाच प्रत्यय येतो. इथे पैशासाठी आपल्या बायका मुलींना हरणारे नवरे, मायबाप पाहिले की तो रावण व दूर्योधनही क्षुल्लक वाटायला लागतात. एवढ्या सगळ्या विटंबना होऊनही, चाललेल्या असूनही, ' यदा यदा ही अधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत म्हणून अवतार घेणारा ईश्वर मात्र इथे अजुनही काही अवतरलेला दिसंत नाही. नंतर कुठेतरी ऎकण्यात येतं की आपल्यातलाच एखादा दृढपणे उभा राहतो व एखादीचा उद्धार करून जातो, तेव्हा कळतं अरे ईश्वर तर त्याच्या अंतरात अवतरला होता आणि आपलं काम करूनही गेला आणि आपण त्याच ईश्वराला बाहेर शोधत होतो.
अश्या एका न पाहिलेल्या, नावही माहित नसलेल्या, त्याच्या कृतीबद्दल फक्त ऎकलेल्या एका खर्या माणसाने एका सुंदर मनाच्या, प्रगल्भ विचारांच्या, शुद्ध बीजाच्या पण परिस्थितीने गणिका झालेल्या स्रीला प्रेम, विश्वास व जबाबदारीचा हात दिला. तिच्या हातांना हळदीचुड्याचा, कपाळाला कुंकवाचा, गळ्याला मंगळसूत्राचा मान दिला. समाजात तिला पत्नीचे अस्तित्व दिले व एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली. आज त्यांना एक मूलही आहे. अशी उदाहरणं पाहिली की सर्वसंगपरित्याग करणार्या योग्यापेक्षाही ही माणसं श्रेष्ठ वाटायला लागतात व त्यांच्या दृढ निर्णयाने मन सुद्धा निःशब्द होऊन जातं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा