जीर्ण शाल उरे शेवटी
*जीर्ण शाल उरे शेवटी..... सुटे मग..*
🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
*अजूनही लतादिदींची प्रत्यक्ष live ऎकलेली गाणी आठवतायत. १९९३-९४ च्या दरम्यान आळंदीला मराठी साहित्य संमेलनात अवघ्या ३०-४० फुटांवरून ऎकलेलं पसायदान तर पुण्याच्या एस्.पी. ग्राऊंडवर झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात ऎकलेली एकाचढ एक गाणी. त्यामुळे अशा दिव्यत्वाची प्रचिती याची देही याची डोळा घेतली यापेक्षा मोठं भाग्य ते आणखी कोणतं?*
🌹 *लता मंगेशकर एक गारुड* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*लता मंगेशकर घडत नसते तर लता मंगेशकर जन्माला यावी लागते. तीही कुठेतरी नाही तर फक्त अन् फक्त संगिताचा चिरंतन वारसा लाभलेल्या मास्टर दिनानाथांच्या घरात. ज्या घराच्या पायर्या सात सुरांच्या आहेत. ज्या घरातलं अवकाश सूर ध्वनींशिवाय काही जाणतंच नाही. ज्या घराच्या भिंती रागस्वरांच्या विविधांगी छटा लेवून देखण्या झाल्यात. तिथे जमिनीवरचे ही सूर आहेत व आकाशातलेही. मंद्रही आहेत व तारही. अशा घरात जगातला सर्वात तान्त व गोड स्वर घेऊन जन्माला यावं ते लतानेच.*
*कोण म्हणतं प्राक्तन नसतं?*
*कोण म्हणतं दैव नसतं?*
*मंगेशकर कुटुंबाकडे बघितलं की सहजंच उमगतं की हे सर्व काही असतंच असतं.*
*लता व बहिणभावंडे ही सर्व स्वर रत्ने विश्वनियन्त्याने बरोब्बर दिनानाथांच्याच घरात का उधळली याचं राहून राहून विशेष वाटतं.*
*ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म जसा त्यांच्या कित्येक जन्मांचं कर्मसार्थक होता*
तद्वतंच
*लतादिदींचा जन्म हा कित्येक जन्मजन्मांच्या स्वरसाधनेचं फलीत होतं असंच वाटतं.*
*लता मंगेशकर व कुटुंबीयांकडे, त्यांचा मंगेशकर कुटुंबात झालेल्या जन्माकडे पाहिल्यावर हेच लक्षात येतं*
की
*गोड काहीतरी घडावं यासाठी तो परमेश्वरही यथाशक्ति किती प्रयत्नशील असतो ना?*
*त्यानं विश्वाच्या संदुकातले युगानुयुगे जतन करुन ठेवलेले सर्वात अमूल्य दैवी गंधर्वस्वर स्वत: घासून पुसून लतादिदींच्या कण्ठात बसवले व तिला दिनानाथांच्या घरी धाडलं.*
*या दैवी स्वरांची प्रचिती म्हणा, बुद्धीची प्रचिती म्हणा किंवा साक्षात्कार म्हणा तो ही दैवयोगे झाला.*
त्यामुळेच वाटतं
*लता ही जन्मापूर्वीच घडली होती. जन्मानंतरचा संस्कार तेवढा बाकी होता व तो ही घडला मास्टर दिनानाथांच्या तालमीत किंबहुना तशी नियतीचीच योजना होती.*
*हेच लतास्वर खालच्या 'सा' वर मूलाधारात मधुर प्रारंभ करते झाले तर वरच्या सा वर अगदी सहस्रारापर्यंत घेऊन गेले.*
त्यामुळेच
*लतादिदींचा स्वर्गीय स्वर शरीररुपी पिण्डात असणारं प्रातिनिधिक ब्रह्माण्डं व परमात्म्यापर्यंतचा प्रवास याची अोझरती अनुभूती देऊन जातो खरा......*
*ही अनुभूती चिरंतन लतादिदींच्या स्वरातून होतंच राहील.*
त्यामुळे
*वरकरणी जन्ममृत्यूचा खेळ जरी दिसंत असला तरी त्याही पलिकडं काहीतरी आहे हे पटावं एवढं सगळं विलक्षण वाटतं.*
*विश्वनियन्त्याचं व लतादिदींचं नातंही यास्तव जवळचं वाटतं.*
*अद्वैतात हे सर्वच विश्व एका शून्यात बीजरुपात एकच आहे हा भाव बीजरुपात सूप्त असला तरीही या सूप्तीतही विश्वनियन्त्याची साक्षीभावाने जाणीव आहे.*
*काहीतरी गोड घडावं किंवा एखादं छान स्वप्न पृथ्वीतलावर चालावं हे त्या नियन्त्याला नक्कीच वाटंत होतं ज्याचं कार्यरुप आपण अनुभवत होतो. उगीच काहीही घडंत नसतं. तसाच लतादिदींचा जन्मही आणि अगदी मृत्यूही.*
*'जीर्ण शाल उरे मग'*
*त्या जीर्णतेला चैतन्याचा आधार व चैतन्याला जीर्णतेचा आधार ही थोड्या काळाचीच संगती. निसर्गाचा तोच नियम. लहान थोरांना कोणालाच कधी चुकला नाही. ही शरीराची जीर्णशाल लतादिदींनी टाकून दिली आणि लता नावाचं कर्णमधुर स्वप्न काल केवळ अस्तित्वरुपाने भंगलं.*
*भगवंताने बीजरुपात पेरलेलं लतेचं बीज वटवृक्षात परावर्तीत झालं होतं व हाच वटवृक्ष काल पुनश्च बीजरुपात अद्वैत होऊन परमेश्वराशी एकरुप झाला.*
*तसं दु:ख करण्यासारखं काहीच नाही कारण आधीव्याधी व जीर्णतेचा भोग संपला. ज्या परमात्म्याने धाडलं होतं तिथेच पुनश्च परतणं झालं.*
*तसं लतादिदींच्या पदरात नियतीचं दान भरभरून पडलं. स्वरसंपन्नतेबरोबर आयुष्ययोगही भरपूर होता.*
*प्रत्येक भारतीय त्यातल्या त्यात आपल्या वयाची पिढी व आपल्या वडिलांचीही पिढी लताच्या गाण्याबरोबरच तिच्या अस्तित्वाचीही साक्षी राहिली हे खरंच किती अभिमानास्पद वाटतंय ना? पण आज सगळंच स्वप्नवत् वाटतंय. लतादिदींचं अस्तित्व व त्यांचं नसणंही.*
*परंतु शेवटी प्रत्येक जण जन्माला येतो तोच मुळात मृत्यूचं काॅन्ट्रॅक्ट साईन करून.*
*कोण कसं तर कोण कसं जातं?*
*परंतु लतादिदींचा मृत्यू व त्या मृत्यूचा सोहळा मात्र एकमेवाद्वितीय होता. भव्य दिव्य होता. आध्यात्म भाषेत सांगायचं झालं तर सोहळा देखणा होता.*
*त्या सोहळ्याचं कोंदण म्हणजे प्रत्येक भारतीयाला आपल्या घरातलीच व्यक्ती गेली असं वाटत होतं. प्रत्येकाचं अंत:करण जड झालं होतं. यापेक्षा मोठं ऎश्वर्य ते आणिक कुठलं?*
*ॐ शांति: शांति: शांति:*
🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
सुंदर संकलन
उत्तर द्याहटवाधन्यवाद पवारसाहेब
हटवासुंदर लिहिलंय...
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाखूपच छान Dr साहेब 👌👌
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाडॉ. साहेब खुप छान
हटवा