उन्हाळ्यातली चर्या आयुर्वेदानुसार
आयुर्वेद उवाच्.....उन्हाळ्यातला आहार-विहार कसा असावा?
अरे बाप रे!!!!! काय हा उकाडा. लू म्हणा किंवा उष्णतेची लाट म्हणा....सगळीकडे नुसता दाह. समजून उमजून निसर्गाच्या सुंदर क्रियाकलापात मानवानं केलेला बेसुमार हस्तक्षेप हा सर्व ऋतुचक्रच बदलताना दिसतोय. त्यामुळे आज वसंतातही ग्रीष्माचा ताप सहन.करावा लागतोय. परंतु निसर्ग हा त्याच्या चालीने चालतच राहतो.
भारतासारख्या मौसमी प्रदेशात सर्व ऋतु परमोत्कट दिसतात. या ऋतुंचेच आयुर्वेदात व जुन्या शास्रांमध्ये ६ प्रकार समजून घेतलेले आढळतात. या ऋतुंमधलाच महत्त्वाचा ऋतु म्हणजे वसंत व यालाच इंग्रजीत स्प्रिंग असंही म्हणतात.
नेहमीचा ऋतुकाळ पाहिला की लक्षात येतं की साधारण एप्रिल च्या मध्यापर्यंत वसंत असतोच असतो. चैत्रपालवी या वसंताची साक्ष देत असते
तर
कोकिळ हा आपल्या गायनाने वसंत उत्सव साजरा करीत असतो.
बहाव्याची पानं पूर्णपणे गळून त्याला नखशिखान्त सोनेरी मनभावन पिवळ्या फुलांचा बहर साज चढलेला दिसतो.
निसर्गाचे हे अवीट सौंदर्य केवळ अवर्णनीय.
ही सर्व वसंतसेना शिशिरकाळाच्या वाटेवरून पुढे येऊन सर्व आसमंत रुप व गन्धाने दिगन्त भारवून टाकते.
शिशिरातल्या गारठ्याने झाडांच्या देठातंच अवरुद्ध झालेली पानं-फुलं वसंतातल्या सूर्यरश्मींनी मोकळी होतात व बाहेर येऊन अक्षरश: आनंदाने बहरतात.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या ऋतुचर्या या सृष्टीतल्या अशाच ऋतुंसापेक्ष विविध रंगढंगांना व सूक्ष्म बदलांना साक्षी ठेवूनच सांगितलेल्या आहेत. उद्देश्य केवळ एकच, मानवाचे आरोग्य उत्तम कसे राहिल?
वसंत हा तसा आदान काळातला मध्यावरचा ऋतु तर शिशिर हा पहिला. आदान म्हणजे मकरसंक्रान्तीनंतर सूर्य रश्मी हळूहळू तीव्र व्हायला सुरुवात होते. शिशिरात खूप सारी थंडी असते तर वसंतात सूर्य रश्मींची तीव्रता थोडी जास्त असते. हेमंत-शिशिरात थंडीमुळे साठलेला कफ वसंतातल्या वाढलेल्या उष्णतेने हळूहळू पातळ व्हायला लागतो व कफाचा प्रकोप होतो.
कफश्चितो हि शिशिरे वसन्ते अर्कांशुतापित:
(अर्क म्हणजे सूर्य व अंशु म्हणजे सूर्यकिरणे)
यासाठी असा संदर्भ वाग्भटाचार्यांनी सांगितेला आहे.
चैत्रवसंतपल्लवीप्रमाणेच या काळात कफदोषही बाहेर पडण्यास उद्युक्त असल्याने आयुर्वेदात या काळात वमनशुद्धी करावयास सांगितलेली आहे. कफादोषाने झालेल्या अनेक व्याधीग्रस्त रोग्यांमध्ये वमन हितकर तर ठरतेच परंतु स्वस्थ व्यक्तींमध्येही वमन शरीराची शुद्धी करवते व भविष्यात होणार्या बर्याच व्याधींपासून मनुष्य दूर राहू शकतो. यामुळे वमन हा वसंतातल्या व्याधींवर तसेच कफज व्याधींवर सर्वात श्रेष्ठ उतारा होय तसेच वमनाबरोबर शिरात साठलेला कफ कमी होण्यासाठी तीक्ष्ण नस्य घेणे (म्हणजे नाकात टाकले जाणारे अौषध), तसेच शरीरस्थ कफ कमी होण्यासाठी व्यायाम, उद्वर्तन (मुस्ता, आमलकी, वचा, सुगंधी कचोरा इ. चूर्णे शरीरावर स्नानापूर्वी चोळणे), भीमसेनी कापूराचा स्नानात वापर करणे या गोष्टी केल्यास कफविकारांपासून निश्चितच उत्तम संरक्षण मिळू शकते.
कफाच्या प्रकोपाने पोटातली भूक मंदावलेली असते. त्यामुळे आहारात सुद्धा विशेषत्वाने काळजी घ्यावी लागते. पोटातला कफ कमी होऊन अन्नाचे व्यवस्थित पाचन होणे अपेक्षित असल्याने वसंत ऋतुत रुक्ष व जुने धान्य घेणे शास्रकारांनी हितकर सांगितलेले आहे.
पुराणयवगोधूमक्षौद्रजाङ्गलशूल्यभुक
तसेच आयुर्वेदात वर्णिलेल्या द्राक्षे व मधापासून बनवलेल्या आसवारिष्टांचं व मधपाणी यांचं सेवनही वसंत ऋतुत उत्तम सांगितलं आहे.
याबरोबरच वसंतात कफप्रकोपामुळे दिवसा झोपणंही वर्ज्य सांगितलं आहे.
परंतु या वर्षीचा वसंतातला उकाडा नेहमीसारखा नसून ग्रीष्मासारखा फारच कडक वाटतोय. ग्लोबल वार्मिंगची झलक म्हणा किंवा रुस-युक्रेन च्या युद्धातून उद्भवलेली उष्णता म्हणा पण उकाडा प्रचण्ड वाढलाय खरा. हा उकाडा नक्कीच निसर्गाला धरून नसून मानवनिर्मितच आहे हे ही खरंच. अशा वेळी वातावरण कसे आहे, ऋतुलक्षणे काय आहेत याचा सखोल विचार करुन निर्णय घ्यावा लागेल व त्याप्रमाणे जर आचरण केलं तर नक्कीच आपले सर्वांचे आरोग्य छान राहू शकेल. त्यामुळेच या वसंतातही आपणा सर्वांना वसंताबरोबरच ग्रीष्म ऋतुचर्याही पाळावी लागेल. परंतु प्रथमत: स्वत:च्या शरीराने ऋतुंमुळे उद्भवलेल्या वातावरणास कसा प्रतिसाद दिलाय तेही पहावं लागेल. जसं शरीरात कफाचं अधिक्य जास्त वाटत असेल म्हणजेच खोकला, सर्दी, अंग जड वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, कफ सुटणे अशी लक्षणे असतील तर नक्कीच केवळ वसंत ऋतुचर्येचा वापर करावा.
परंतु अशी लक्षणे नसतील व जास्त बलक्षय वाटत असेल, द्रवक्षय वाटंत असेल तर निश्चितंच ग्रीष्म ऋतुचर्येचा अवलंब करावा. त्यासाठी उन्हाळ्यात आपण कसा आहार घ्यायला हवा? आपला विहार कसा असावा? याबद्दल आयुर्वेदात दिलेल्या शिरस्त्याप्रमाणे पालन करावे.
ही ग्रीष्म ऋतुचर्या आहे तरी कशी ते आता आपण पाहुयात.....
आयुर्वेदात
अत्यर्थ तीक्ष्ण उष्ण रुक्षा मार्गस्वभावत:।
आदित्यपवना:
असं वर्णन आलंय. सुर्याचा ताप इतका परम म्हणजे तीक्ष्ण, उष्ण व रुक्ष असतो की
आदित्यपवन: सौम्यान् क्षपयन्ति गुणान्
त्यामुळे
शरीरातले सर्व सौम्य गुण कमी होतात, शीतलता कमी होते. वसंतातला प्रकुपित कफ पूर्णपणे कमी झालेला असतो. शरीरातला जलांश कमी होतो ज्याला आपण dehydration असं संबोधतो. घाम जास्त येतो. त्वचेवरची रोमरंध्र खुली होत असल्याने शरीरांतर्गत उष्मा बाहेर पडण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे याकाळात अग्निही दुर्बळ होतो.
ग्रीष्म हा आदानकाळाचा अतिशय उत्कट ऋतु सांगितलेला आहे.
तीक्ष्णांशु..... ग्रीष्मे
आदान म्हणजे हिसकावून घेणे. याच आदानकाळात प्राणीमात्रांचं बळ सृष्टी हिसकावून घेत असते. त्यामुळे निसर्गत:च या ऋतुत इतर ऋतुंच्या तुलनेत प्राणीमात्रांचे बळ कमी असते.
या अशा दाहक ग्रीष्म ऋतुत लवण (खारट), कटू (तिखट) व आम्ल (आंबट) चवींचं किंवा तत्सम पदार्थांचं सेवन करू नये असं ग्रंथकार सांगतात.
मग अाहार असावा तरी कसा? असा प्रश्न अापल्याला पडू शकतो.
तर
भजेन्मधुरमेवान्नं लघु स्निग्धं हिमं द्रवम्।
म्हणजेच
ग्रीष्मात घ्यावयाचे अन्न हे चवीला गोड, पचायला हलके तसेच स्निग्ध व शीत गुणाचे असावे.
माठातले पाणी, मधुर सरबत, जास्त न विरजलेल्या दह्याचे थंड ताक घ्यावे.
ज्वारी भाकरी गुणाने थंड व सुपाच्य असल्याने अवश्य घ्यावी.
मूग पचायला हलके व दोष न वाढवणारे असल्याने वरणासाठी मूग अवश्य वापरावेत.
एक वर्षापेक्षा जास्त जुन्या लालसाळीच्या तांदळाचा भात दोष वाढवत नसल्याने ग्रीष्म ऋतुत आरोग्यास उत्तम असतो.
भाज्यांमध्ये काकडी, कोहळा, दूधी भोपळा, पडवळ, कारले, माठ, तांदुळजा या भाज्या उत्तम ठरतात
तर
फळांमध्ये कलिंगड, द्राक्षे, आंबा, खरबूज, डाळिंब, संत्रे, मोसंबी, नारळ, सफरचंद, कोकम ही फळे यथेच्छ घेतल्यास शरीरातला शरीरसदृश द्रवांश बर्यापैकी भरून निघतो.
विहाराचा विचार केल्यास
उन्हात जास्त फिरू नये. फिरणे अनिवार्य असल्यास पूर्ण शरीरावर पांढर्या रंगाचे वस्त्र घ्यावे.
उन्हातून आल्यावर त्वचेवर हलकेसे शतधौत घृत लावावे.
उन्हातून सावलीत आल्यावर लगेच घटघट पाणी पिऊ नये, अतिथंड पाणीही पिऊ नये. सावलीला शरीर थोडे सरावल्यावर पाणी घ्यायला हरकत नाही.
त्वचेवर उन्हामुळे आग होत असेल तर चंदन, मुस्ता, अनंतमूळ अशा सुगंधी व शीतल द्रव्यांचे लेप करावेत. अतिघाम येऊन उन्हाळ्याचा त्रास जास्त जाणवत असेल तरीही या अौषधांचे लेप खूपच गुणकारी ठरतात.
डोळ्यांच्या संरक्षणासाठी UV Protection सहीत गडद काळ्या रंगाच्या काचा असलेला गाॅगल घालावा.
नारळ पाणी, नीरा, लिंबू सरबत, कोकम शरीरातलं पाणी कमी झाल्यावर लगेच भरून काढतात. परंतु त्यांचा अतिरिक्त वापर भूक कमी करू शकतो. त्यामुळे वरील पेयद्रव्ये गरजे इतकी घेत रहावीत.
अशाप्रकारे सर्वांनी या ऋतुचर्यांचा वापर केल्यास सर्वांचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील. कारण आयुर्वेदाचा प्रत्येक उपदेश हा अमृतासारखा आहे.
वैद्य अतुल ज. काळे
एम्.डी. (आयुर्वेद), जी.ए.यु.

अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद डॉ. साहेब
उत्तर द्याहटवाडॉ. साहेब खुप छान माहिती .
उत्तर द्याहटवाधन्यवाद .